370…

Maruti Naik
1 min readOct 12, 2019

--

तीनशे सत्तर, तीनशे सत्तर.

प्रत्येक प्रश्नाचं, एकच उत्तर,
तीनशे सत्तर, तीनशे सत्तर.

आत्महत्या होतात, होऊ द्या,
कारखाने बंद पडतात, पडू द्या,
खड्ड्यात रस्ते शोधताय, शोधू द्या
कर्जात बुडालो तरी बेहत्तर,
तीनशे सत्तर, तीनशे सत्तर.

रातोरात साफ करा जंगल,
राडा संपला तर घडवा दंगल,
कांदा तो कांदा, महाग झ्हाले टमाटर,
तरी कोकलत रहा,
तीनशे सत्तर, तीनशे सत्तर.

विहिरी खणल्या किती, मोजल्या नाही
झाडे लावली किती, हिशोब नाही,
सगळं कमी म्हणून आता
दिल्लीतला शाह बशीवला उरावर,
तीनशे सत्तर, तीनशे सत्तर.

--

--

Maruti Naik

I write to remember. I write to remain honest. I write to leave a bread crumb trail for my daughter. I write to relax. Trying to impress my better half, I write