प्रार्थना
--
सकाळी चालताना
अजान ऎकत
दिवस उगवतो
नऊच्या सुमारास
शेजारच्या घरातला
शंख ऐकत
मी लॅपटॉप उघडतो
काम सुरु होतं
संध्याकाळी पाच — सहा वाजता
एक बासरी वाला
सुंदर धून वाजवत
आपल्या घरी जातो
पाखरा वाणी
रात्री ऐकू येणारा
siren चा आवाज
मी हळूच डोळे मिटतो
नमस्कार करतो
कधी काळी शिकलेली
मध्यंतरी विसरलेली
आणि
आता पुन्हा आठवलेली
प्रार्थना म्हणतो