निरोप
--
ओ दाढीवाले बाबा,
जरा थांब ना रे,
तुझ्या तोंडाला मर्यादा जरा,
घाल ना रे.
काय तुझा भाव,
काय तुझा राग रे,
मनातले एवढे बोललास,
आतातरी लोकांचे ऐक ना रे.
किती मारशील थापा,
किती वाढवशील ताण,
पाच दसरे झाले,
आता तरी नीट धर तो बाण.
कसा रे तू असा,
स्वत:ला समजतोस कापूस रे,
दहा लाखाचा सूट चढवलास तरी,
चड्डी तुझी खाकी रे.
सभेत तुझ्या खुर्च्या रिकाम्या,
तंबू तुमचा खाली रे,
झोला शिवून तयार आहे,
निरोपाची वेळ आली रे.